रावेरच्या बदल्यात पुणे मतदारसंघ घेणार का?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

रावेरच्या बदल्यात पुणे मतदारसंघ घेणार का?, अजित पवार यांची प्रतिक्रिया!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडला आहे. या मतदारसंघाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे मतदारसंघ मागितल्याची चर्चा आहे. परंतु काँग्रेसकडे पर्यायी मतदारसंघ मागितला नसल्याचं राष्टेरवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रावेरच्या मोबदल्यात पुणे या विषयाला अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रावेर आणि पुणे या दोन्ही मतदारसंघांत बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, त्यामुळे कॉंग्रेसच्या पुण्यातील उमेदवाराची घोषणा करण्यास वेळ लागत असल्याचे बोलले जाते आहे. परंतु “कोण किती जागा लढवतेय, याला जास्त महत्त्व न देता जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने आणि तेथील कार्यकर्त्यांमध्ये वातावरण चांगले राहण्यासाठी रावेरचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS