राहुल गांधींची तिथे थोडी गडबड झाली – अजित पवार

राहुल गांधींची तिथे थोडी गडबड झाली – अजित पवार

मुंबई – मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या शिबरात बोलताना अजित पवार यांनी काल राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचं सरर्थन केलं तसेच राहुल गांधी यांनी मोदींची गळाभेट घेतली यात त्यांचं काहीच चुकलं नाही परंतु त्यांनी बाकावर बसल्यावर जे (डोळे मिचकावले) ते त्यांनी करायला नको होतं. तिथे त्यांची थोडी गडबड झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. पक्षातील प्रत्येकाला मान देत चला तो पुढे गेला तर माझं कसं व्हायचं असा विचार करु नका. चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचे असतात त्यामुळे एकमेकांची उणी-दणी काढत बसू नका. तसेच अनेक कार्यकर्ते पद मिळालं की स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि असे प्रकार नंतर आमच्यापर्यंत येतात. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. त्यासाठी असे प्रकार करु नका असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

COMMENTS