समृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार

समृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार

मुंबई – समृद्धी महामार्ग तयार व्हायला अजून चार-पाच वर्ष आहेत. त्यावरुन भांडत बसले आहेत. परंतु समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार असून तुम्ही बसा भांडत अस यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिक्षक-प्राध्यापक चोर, तर संस्थाचालक दरोडेखोर असल्याचं विनोद तावडे यांनी माझ्याकडे अनेकवेळा बोलून दाखवलं असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान काही शिक्षण संस्थांनी शिक्षणाचे बाजारीकरण केलं असेल तर काही चुकीच्याही वागल्या असतील. चुकीच्या संस्थांवर तुम्ही आक्षेप घ्या त्यावर आमचं काहीही म्हणणं नाही. परंतु चांगलं काम करणा-या संस्थांच्या अडचणी दूर करा असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS