अजित पवारांनी शरद पवारांना पाठवला ‘हा’ निरोप ?

अजित पवारांनी शरद पवारांना पाठवला ‘हा’ निरोप ?

मुंबई – राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवार यांनी शरद पवार यांना एक निरोप पाठवला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फूट पडून द्यायची नसेल तर पक्षाने भाजपला पाठिंबा द्यावा,’ असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी तसेच अजित पवार यांची परत घरवापसी करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवार थांबलेल्या ब्राइटन इमारत इथं गेले होते. यावेळी सर्व नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

दरम्यान राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे परत राष्ट्रवादीत परतले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. त्यामुळे हा अजित पवार आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS