लोकांच्या आरोग्याशी खेळणा-यांना जन्मठेपेची शिक्षा -अजित पवार

लोकांच्या आरोग्याशी खेळणा-यांना जन्मठेपेची शिक्षा -अजित पवार

मुंबई – विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा विषय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच उसाच्या रसात वापरलं जाणारा बर्फात ८० टक्के बर्फ दुषित असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं लोकांच्या आरोग्याशी खेळणा-यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेत अजित पवार यांनी केली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनीही लोकांच्या जेवणात आता शेण यायला लागलंय
यावर मोठा कारवाई केली पाहिजे अशी मागणी
केली आहे.

दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून दोन्ही घटना गंभीर आहेत.विधानभवनात कॅन्टीन अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार चालते की नाही त्याची पाहणी करण्यात येईल. तसेच अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आलेत आणि वाईट अवस्था समोर आली आहे. आॅनलाईनद्वारे दिलं जाणार्‍या अन्नाबाबतही गैरप्रकार लक्षात आले आहेत. तसेच जिथे जिथे सरकारी रुग्णालयात सरकारी डबे जातात ते FSSAI च्या नियमानुसार नुसार आहेत की नाही याची तपासणी केली जाणार असल्याचं मुख्यमत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS