मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय!

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय!

मुंबई – मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद करणार नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
या बैठकीला अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी मराठवाडा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करणार असून लातूर, बीड, उस्मानाबादचा पाणी प्रश्न सोडवण्याला प्राथमिकता देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी मंत्री अशोक चव्हाण यांनी वॉटर ग्रीडचा आढावा घेतला. 11 धरणे आहेत त्यातील 50 टक्के धरणं तुटीची आहेत, या धरणात पाणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे वॉटर ग्रीड कशाप्रकारचे पिण्याच्या पाण्यासाठी वापरता येईल यावर चर्चा झाली असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत अंतिम निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाईल असंही चव्हाण म्हणाले आहेत.

तसेच समुद्रात वाहून जाणारं पाणी जायकवाडीत घेण्याबाबत चर्चा झाली हा प्रकल्प रद्द केलेला नाही
पाणी सर्वांना लागते, यात भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असले तरी पाणी लागते, यात पक्षीय विषय नाही. पाणी सर्वांना उपलब्ध झालं पाहिजे. आधी पाणी उपलब्ध करून घ्यावं आणि वॉटर ग्रीडचा विषय घ्यावा. पूर्ण ग्रीड एकत्र न करता एक एक जिल्हा घ्यावा असं ठरलं असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच लातूरसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना प्राथमिकता द्यायची ठरलं आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. वॉटर ग्रीड रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, प्रक्रिया सुरू आहे, प्रकल्प थांबवलेला नाही असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS