जेंव्हा अजित पवार विटी दांडू खेळतात ! पाहा व्हिडीओ

जेंव्हा अजित पवार विटी दांडू खेळतात ! पाहा व्हिडीओ

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विटी दांडू खेळ्ण्याचा आनंद लुटला असल्याचं पहावयास मिळालं आहे. बारामतीतल्या खेळाच्या जत्रेत त्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण दिनाचे ओचित्य साधून बारामती येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या जत्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला. विषेश म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले होते.

दरम्यान येत्या तीन दिवस चालणा-या या महोत्सवात विटी दांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार यांनी थेट मैदानात येत विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS