त्यामुळे मी राजीनामा दिला, अजित पवारांनी मांडली भूमिका!

त्यामुळे मी राजीनामा दिला, अजित पवारांनी मांडली भूमिका!

मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो. मी शक्यतो सर्व गोष्टी शरद पवारांना सांगतो. मात्र, शरद पवारांना या वयात त्रास झाल्याने मी कुणालाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी माझा फोन बंद करुन ठेवला. काल मी मुंबईतच नातेवाईकांकडे होतो. हे 2010 चं प्रकरण आहे. ते आज निवडणुकीच्या काळातच का आणलं गेलं, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा केली. या चर्चेनंतर शरद पवार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली. यावेळी चिंतेचे काहीही कारण नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

COMMENTS