काय चौकशी करायची ती करा, अजित पवारांचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर !

काय चौकशी करायची ती करा, अजित पवारांचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर !

बारामती सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यावर  अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काय चौकशी करायची ती करा, होऊन जाऊ द्या एकदाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. तसेच भाजपवाले त्यांचेच घोटाळे लपवण्यासाठी अशी वक्तव्य करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. ते बारामतीमध्ये दुष्काळी दौ-यादरम्यान बोलत होते.

या मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. ज्या सदा खोतांना राजू शेट्टींनी आमदार केलं, मंत्री केलं त्यांनाच खोतांनी सोडलं. ज्यांच्यामुळे यांची ओळख निर्माण झाली ते त्यांचेच राहिले नाहीत तर इतरांचे ते कसे असतील अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली आहे.

COMMENTS