अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, फडणवीसही देणार राजीनामा ?

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, फडणवीसही देणार राजीनामा ?

मुंबई – राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तसेच देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुद्यावर संसद भवनात भाजप नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीकडेही लक्ष लागलं आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने उद्या (बुधवार)बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या. गुप्त मतदान नको. खुल्या पद्धतीने मतदान होणार. बहुमत चाचणीचं लाईव्ह रेकॉर्डिंग होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. परंतु यापूर्वीच अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तर फडणवीसही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS