अजित पवार आणि श्रीरंग बारणे एकमेकांशेजारी बसले, पण…

अजित पवार आणि श्रीरंग बारणे एकमेकांशेजारी बसले, पण…

मावळ – एका कार्यक्रमानिमीत्त एकत्रित आलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे मावळ येथील खासदार श्रीरंग बारणे यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं असल्याचं पहावयास मिळाले आहे. पुण्याच्या कान्हे फाटा येथील सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. यावेळी मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे देखिल उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि बाळा भेगडे हे मुक्तसंवाद करताना दिसले. मात्र याचवेळी श्रीरंग बारणे हे शेजारी बसलेले असताना देखील त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं.

दरम्यान प्रचाराच्या रणधुमाळीत पवार कुटुंबीयांना जिल्ह्यातून हद्दपार करू असं जाहीर वक्तव्य करणारे भेगडे थेट अजित पवारांच्या शेजारी बसले होते. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. परंतु राजकीय मतभेद बाजूला ठेवत दोघे एकमेकांशी मुक्त संवाद साधताना दिसून आले. परंतु निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी पार्थशी हस्तांदोलन करणाय्रा बारणेंनी मात्र अजित पवारांशी बोलणं टाळलं.

COMMENTS