पार्थ पवारांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण !

पार्थ पवारांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची राजकारणातील प्रवेशाची पूर्वतयारी असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर अजित पवार आणि पार्थ पवार हे दोघेही आले होते. त्यामुळे पार्थ पवारांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी तर नाही ना, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

दरम्यान पार्थ पवार हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. अशातच अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार हे एकाच व्यासपीठावर आले आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पार्थ पवार पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले असून त्यावर पार्थ पवार यांचे फोटो झळकत आहेत. त्यामुळे पार्थ पवार आता प्रत्यक्षात राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली असल्याचं पहावयास मिळाले.

 

COMMENTS