अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्रितपणे घेतले लालबागच्या राजाचे दर्शन !

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्रितपणे घेतले लालबागच्या राजाचे दर्शन !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे देखील उपस्थित होते. आज कुटुंबातील सदस्यांसोबत ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतलं आणि राज्यातल्या दुष्काळाचं सावट असलेल्या भागांत किमान परतीचा पाऊस तरी चांगला पडावा, असं साकडं लाडक्या बाप्पाला घातलं असल्याचं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी राज्यातील जनतेला सुखी ठेवण्यासाठी तसेच परतीचा चांगा पाऊस पडू दे, महागाई वाढत आहे तिचा सामना करण्याची ताकद सामान्य माणसात येऊ दे असं साकडं दगडूशेठला सुप्रिया सुळे यांनी घातलं आहे.

सुप्रिया सुळे, दगडूशेठ दर्शन

 

COMMENTS