अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची भाऊबीज, पाहा व्हिडीओ !

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची भाऊबीज, पाहा व्हिडीओ !

पुणे, बारामती – दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आपल्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्टिटरवरून भाऊबीजेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. भाऊबीज हा सण साजरा करण्यासाठी अजित पवार यांच्या सर्व बहहिणी एकत्रित आल्या होत्या. औक्षण करताना सर्व बहिणी या फोटोत दिसत आहेत.तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाचा दीपोत्सव बारामतीत कुटुंबियांसमवेत साजरा केला असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

COMMENTS