आम्ही जुळी भावंडं, कोणी छोटा नाही, मोठा नाही, यावरु अजित पवारांना काय सुचावचंय ?

आम्ही जुळी भावंडं, कोणी छोटा नाही, मोठा नाही, यावरु अजित पवारांना काय सुचावचंय ?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबत आपलं मत व्यक्त केलं. भंडारा गोंदियामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांना त्यांनी विजयाचं क्रेडिट दिलं. नाना पटोले यांच्या कामाचंही त्यांनी तोंडभरु कौतुक केलं. दोन्ही काँग्रेसने आता सांमजस्यानं भूमिका घ्यायला हवी आणि तुटेपर्यंत तोडता कामा नये असा सल्लाही दोन्ही पक्षातल्या नेत्यांना दिला.

हे बोलत असताना त्यांनी काही जांगावर वाद होत असेल तर दोन्ही पक्षांनी त्यावर दोन पावले मागे घेत तोडगा काढवा असंही बोलले. तसंच आघाडीचं जागावाटप सन्मानपूर्वक व्हावं याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्याच वेळी आम्ही जुळी भावंडं आहोत. आमच्यात कुणी मोठा आणि कोणी छोटा नाही असंही त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्याचा आता वेगवेगळा अर्थ काढला जातोय. जुळी आणि कोणी मोठा आणि कोणी छोटा नाही याचा अर्थ दोन्ही पक्षांची ताकद समान आहे आणि आता फिफ्टी फिप्टीचा फॉर्म्युला करायला हवा असं अप्रत्यक्षपणे सुचवलं अशीही कुजजुब राजकीय वर्तुळात आहे. आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते ते पहावं लागेल.

COMMENTS