पवार काका पुतण्यांना काटेवाडीतच भाजप-रासप युतीचे आव्हान !

पवार काका पुतण्यांना काटेवाडीतच भाजप-रासप युतीचे आव्हान !

बारामती – काटेवाडी हे शरद पवार आणि अजित पवार यांचं गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणूक आजपर्य़ंत बिनविरोध व्हायची. यंदा प्रथमच तिथे निवडणूक लागली आहे. भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्र येत इथं पवार काका पुतण्यांना गावातच आव्हान दिलं आहे. विरोधकाचं आव्हान किती तगडं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल, मात्र पवारांना गावातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलं नाही हेही तिककच खरं आहे.

यंदा सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे. पवारांचे भवानीमाता पॅनल आणि भाजप आणि रासपचे लोकशाही ग्रामविकास पॅनलमध्ये ही लढत होणार आहे. सरपंचपदासाठी भवानीमाता पॅनलकडून विद्याधर काटे हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजप रासप यांच्या पॅनलकडून पांडुरंग कचरे हे काटे यांना आव्हान देत आहेत. या दोघांना गावातील एका तृतीयपंथी उमेदवाराने आव्हान दिले आहे. सुनिता गायकवाड हे तृतीयपंथी संरपंचपदासाठी नशीब अजमावत आहेत. पवारांच्या गावात निवडणूक लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

COMMENTS