मोदीजी पंतप्रधानासारखे वागा, चहावाल्यासारखे नका-अकबरूद्दीन ओवेसी

मोदीजी पंतप्रधानासारखे वागा, चहावाल्यासारखे नका-अकबरूद्दीन ओवेसी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी यांनी जोरदा टीका केली आहे. मोदी हे प्रत्येक गोष्टीत चहा आणतात. कडक चहा, नरम चहा, चहापत्ती, निर्णय घेतला की चहाचा विषय. चर्चा करायची असेल तर चहाचा विषय अरे तुम्ही चहावाले होतात. आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका असं अकबरूद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. हैदराबादमधल्या एका रॅलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्चव्य केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम त्यांच्या भाषणामध्ये मी चहावाला होतो. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला याचा विरोधकांना त्रास होतो. ‘चायपे चर्चा’चे उदाहरणही देतात. आता याच सगळ्या मुद्द्यांवरून अकबरूद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून आता पंतप्रधान आहात पंतप्रधानांसारखे वागा चहावाल्यासारखे वागू नका असं अकबरूद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS