पुतण्याच्या आव्हानाने दादांचा गावात शड्डू

पुतण्याच्या आव्हानाने दादांचा गावात शड्डू

सोलापूर: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शतकांपासून काका-पुतण्याचे वैर संपता संपत नाही. अगदी ग्रामंपचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुकीत काका-पुतण्याच्या वादामुळे त्या त्या निवडणूका नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री पदी राहिलेल्या पश्चित महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याच्या पुणत्याने ग्रामपंचायत निवडणुकीत आव्हान उभे केले. नुसते आव्हानच नाही तर पुतण्याने आपल्या पत्नीची जागा बिनविरोध करून दादांना जबरदस्त धक्का दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर ७ दशकांपासून सोलापूरतील मोहिते-पाटील घऱाण्याचा दबदबा आहे. अकलूज या छोट्याशा गावापासून राजकिय कारकिर्द सुरु करणाऱ्या शंकरराव मोहिते-पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्थान निर्माण केले. त्यांच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली. अकलूजच्या राजकीय साठमारीत विजयसिंह मोहिते पाटलांचे लहान बंधू कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते घरापासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासून अकलूजमध्ये दोन सत्तास्थाने बनली. यात मुख्य घर असलेल्या विजयदादा यांच्यासोबत बाकीचे भाऊ व कुटुंबीय राहिल्याने सर्व सत्तास्थाने ही त्यांच्याच गटाकडे राहिली आहेत. माजी सहकार मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते आजही त्यांचे पुत्र डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहिले आहे.

सध्या अकलूज ग्रामपंचायतीची निवडणुक लागली असून आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा संघर्ष उभा राहिला आहे. यामध्ये असून विजयदादा यांच्या पॅनल समोर धवलसिंह यांनी नुसते पॅनल उभा केले नाही तर आपल्या पत्नी उर्वशीदेवी याना बिनविरोध निवडून आणत निकालात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विजयदादा यांच्या सोबत असणारे त्यांचे दुसरे पुतणे धैर्यशील यांनी राजकिय संन्यासाची घोषणा केली. त्यानंतर विजयदादांच्या पॅनलची नुकतीच सभा झाली. या सभेला विजयदादा, जयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व सर्व इतर मोहिते कुटुंबीयांची उपस्थिती निवडणुकीचे गांभीर्य वाढवणारी होती

COMMENTS