आदित्य ठाकरेंचा दौरा रद्द झाला अन् शिवसेनेचे खासदार, आमदार आपसात भिडले !

आदित्य ठाकरेंचा दौरा रद्द झाला अन् शिवसेनेचे खासदार, आमदार आपसात भिडले !

अकोला – आज अकोला येथे शिवसेनेच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेती अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांवर गंभीर टीका केली आहे. आमदार गोपीकिशन बाजोरिया बेशिस्त वागत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  तर ‘ अरविंद सावंत यांची वागणूक बेशिस्त आणि बलिशपणाची असल्याची टीका आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केली आहे.

दरम्यान आज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांला आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथे आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील 250 आत्महत्या शेतकरी कुटुंबाना कौटुंबिक साहित्याचे वाटप केले आहे. त्यानंतर हा कार्यक्रम अटोपून आदित्य ठाकरे हे अकोल्याला जाणार होते. परंतु अचानक त्यांचा अकोल्याचा दौरा रद्द झाला. आदित्य ठाकरे यांचा हा दौरा रद्द झाला आणि शिवेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.  संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

COMMENTS