राष्ट्रवादीच्या वर्मावर बोट ठेवताच भाजपचा काढला पुरुषार्थ

राष्ट्रवादीच्या वर्मावर बोट ठेवताच भाजपचा काढला पुरुषार्थ

मुंबई – राज्यात सध्या विविध मुद्द्यांवर भाजप विरुध्द राष्ट्रवादीमध्ये यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर आरोप केला. या दोघांच्या मदतीला त्यांच्या पक्षाचे नेते धावून आले आहे. पवारांसाठी जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यासाठी राम कदम यांनी हल्ला चढवला. यावेळी भाजपकडून वर्मावर बोट ठेवल्याने राष्ट्रवादीकडून थेट पुरुषार्थ काढला

ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, असंही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला हाणला.

त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर शरसंधान साधलंय. एका महिला लोकप्रतिनिधीनं तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणं हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला आहे. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय.

याच टीकेला राम कदम यांनी प्रत्युतर दिले. आम्ही कधीही व्यक्तिगत टिप्पणी करत नाही. चंद्रकांत पाटील हे महाष्ट्रात कुठूनही निवडून येतात हेच जयंत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितले आहे. पण जयंत पाटील यांचे सर्वेसर्वा इतर कोणत्याही मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची हिंमत करत नाहीत. हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य जयंत पाटील यांच्या वर्मी लागलेले दिसत आहे, असे राम कदम यांनी जयंत पाटील यांना टोला लगावताना म्हटले आहे.

COMMENTS