धनंजय मुंडेंच्या आदेशानंतर शेतकय्रांना दिलासा, अंबाजोगाई तालुक्यात थकीत पीकविमा वाटपास सुरुवात!

धनंजय मुंडेंच्या आदेशानंतर शेतकय्रांना दिलासा, अंबाजोगाई तालुक्यात थकीत पीकविमा वाटपास सुरुवात!

अंबाजोगाई – तीनच दिवसांपूर्वी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मुजोरी करणाऱ्या पीक विमा कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच जाग आलेल्या पीकविमा कम्पनीने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे थकीत पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा, अकोला, राडी, राडी तांडा, मुडेगाव यांसह अन्य काही गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज विम्याचे पैसे जमा झाले असून सम्बंधित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांचेही थकीत पिकविमे येत्या आठवड्याभरात जमा होतील असे विमा कंपनीकडून कळवण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मुजोर विमा कंपन्यांच्या कारभाराला दणका दिला होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ना. मुंडेंनी थकवलेल्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते. त्यांच्या या दणक्याचा इम्पॅक्ट जिल्ह्यातील जनतेला तीनच दिवसात दिसून आला आहे, अशी चर्चा अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील एकही शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये हीच आपली भूमिका असून त्यासाठी गरज पडल्यास आपण कंपन्यांवर कारवाई सुद्धा करू असे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

COMMENTS