विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट !

अकोला – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संपर्कात असलेले हे दहा आमदार कोण आहेत याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

तसेच राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोलाही यावेळी आंबेडकरांनी लगावला आहे.तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या प्रमुख कार्यकर्त्यांची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. पुढच्या काळात राजू शेट्टींनी कुणासोबत जावं ते लवकर ठरवावं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी दर्शविल्याचे संकेतही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिले आहेत. पक्षाची रणनीती, कोणाशी युती-आघाडी करणार, यासंदर्भातील भूमिका ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS