प्रकाश आंबेडकरांनी साधला शरद पवारांवर निशाणा !

प्रकाश आंबेडकरांनी साधला शरद पवारांवर निशाणा !

पुणे   शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते असल्याचा निशाणा भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी साधला आहे. राज्यासह देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु असून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना चिथावणारं वक्तव्य केलं होतं. दिलेली आश्वासनं पाळण्याची सरकारची नियत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान शेतकरी जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत. त्याला अन्नधान्य, शेतमाल फेकण्याशिवाय पर्याय नाही. जातीसाठी किती माती खायची हे शेतकऱ्यांनी आता ठरवलं पाहिजे  असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ”इतके वर्षे सत्तेत असताना जनतेची कामं करता आले नाही. शेतकऱ्यांना चिथावण्यामागे पुन्हा सत्तेत जाण्याची घाई आहे असं दिसतं असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना आत्महत्या थांबवता आल्या नसल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी पवारांना लगावला आहे.

COMMENTS