अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला आग !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला आग !

अमेरिका – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला आग लागली आहे. ट्रम्प यांचे दुसरे घर असलेल्या ट्रम्प टॉवरला ही आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. मॅनहॅटन येथील आलिशान वस्तीत ट्रम्प टॉवर आहे. या २७ मजली इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं कुटुंब सुखरुप असून राष्ट्राध्यक्ष ते आपल्या कुटुंबियांसह व्हाईट हाऊसमध्ये राहत आहेत. या इमारतीच्या बहुतेक मजल्यांवर ट्रम्प यांचे कार्यालय असून इमारतीच्या गच्चीवरील इलेक्ट्रीक बॉक्सला अचानक आग लागली होती.त्यानंतर काही क्षणात ही आग पसरली होती. परंतु माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

COMMENTS