सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला, महाराष्ट्रात काय?, पाहा काय म्हणाले अमित देशमुख !

सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला, महाराष्ट्रात काय?, पाहा काय म्हणाले अमित देशमुख !

मुंबई – सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला आहे. परंतु याचा विचार महाराष्ट्र सरकार गांभीर्याने करत असल्याचं वक्तव्य मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. आमची सिनेमागृह मालकांशी चर्चा झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी नाट्यगृहासाठी मौसम असतो. त्यामुळे परवानगी द्यावी ही विनंती केली आहे. आम्ही सकारात्मक आहोत त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. त्यामुळे शिथिलता देण्याआधी विचार करू मग निर्णय घेऊ असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

सिने सृष्टी आणि नाट्य सृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर अर्थिक संकट आहे. तसेच ग्रंथालय या
या गोष्टी थोड्या फार काळात सुरू होतील अशी मान्यता आहे. त्याचा तपशील काही दिवसात स्पष्ट होईल.पुस्तक घरी घेऊन कोणी जाणार असेल तर विचार करता येईल. अशा शिथिलता देण्याबाबत विचार करता येऊ शकतो. पूर्णपणे ग्रंथालय,कोचिंग क्लासेस हे कधी सुरू करता येईल हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS