राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी, अमित शाहांचे आवाहन !

राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी, अमित शाहांचे आवाहन !

रायपूर – महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर याबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन अमित शाह यांनी राहुल गांधींना केलं आहे. छत्तीसगढमधील रायपूर येथे घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाची स्वप्ने राहुलबाबा पाहत आहेत. मात्र त्यांचे हे दिवास्वप्न असल्याची टीकाही यावेळी शाह यांनी केली आहे. छत्तीसगड विधानसभेतील 90 जागांपैकी 65 जागांवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न आदेशही यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

COMMENTS