अमित शाहांच्या फोननंतर उदयनराजे दिल्लीला जाणार?

अमित शाहांच्या फोननंतर उदयनराजे दिल्लीला जाणार?

मुंबई – भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना फोन केल्याचं समोर आलं आहे. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं केली असून यामध्ये भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना फोन केला आहे. त्यानंतर बापट यांनी हा फोन अमित शाह यांच्याकडे दिला. यावेळी अमित शाह यांनी उदयनराजे भोसले यांना दिल्लीत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उदयनराजे लवकरच शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीला जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आगामी निधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. साताय्रातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तेखील भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आज स्वत: अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना फोनवरुन दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनंतर उदयनराजेही भाजपात जाणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

COMMENTS