अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन, उपसभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा ?

अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन, उपसभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा ?

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती आहे. तसेच गुरुवारी पार पडणा-या राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच यावेळी अमित शाह यांनी या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

दरम्यान एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरिवंश यांना राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अकाली दलाने नाराजी व्यक्त केली असून मतदानादरम्यान अकाली दलाचे तीन खासदार मतदानाच्यावेळी गैरहजर राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपला कसरत करावी लागत आहे. त्यासाठी अमित शाह यांनी शिवसेनेला पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव ठाकरे एनडीएला पाठिंबा देणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS