अमित शाहांच्या हातून तिरंगा निसटला, काँग्रेसकडून जोरदार टीका ! पाहा व्हिडीओ

अमित शाहांच्या हातून तिरंगा निसटला, काँग्रेसकडून जोरदार टीका ! पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते आज भाजपच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाह यांच्या हातातून ध्वजारोहणादरम्यान तिरंगा निसटला असल्याची घटना घडली आहे. अमित शाह यांनी झेंडा फडकावण्यासाठी रस्सी खेचल्यानंतर तिरंगा वर जाण्याऐवजी एकदम खाली आला. झेंडा खाली येत असल्याचं पाहता शाह यांनी लगेच दुसरी रस्सी खेचून झेंडा पुन्हा वर नेला आणि फडकावला. याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसनं ट्वीट केला असून या प्रकारामुळे काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. जे देशाचा झेंडा साभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

COMMENTS