अमित शाह, फडणवीस यांच्या बैठकीत शिवसेना-भाजप युतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय!

अमित शाह, फडणवीस यांच्या बैठकीत शिवसेना-भाजप युतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय!

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अमित शाह यांनी शिवसेना-भाजपमध्ये युती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीत विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं दिसत आहे.

तसेच राज्यातील दोन्ही नेतृत्वाने जागावाटपाबाबत चर्चा करुन जागावाटप लवकर पूर्ण करण्याचे आदेशही शाह यांनी दिले असल्याची माहिती आहे. दरम्यान दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु काल झालेल्या बैठकीत शाह यांनी शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS