पवारांनी बारामती, पुणे आणि महाराष्ट्रासाठी काय केलं  – अमित शाह

पवारांनी बारामती, पुणे आणि महाराष्ट्रासाठी काय केलं – अमित शाह

बारामती – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची बारामती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी शाह यांनी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही जे केलं त्याचा हिशोब आम्ही दिला. पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा थेट सवाल शाह यांनी केला आहे. बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी अमित शाह बारामतीत आले होते.

दरम्यान सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही. त्यांना कुटुंबाशिवाय काहीही दिसत नाही. महाराष्ट्राला तुम्ही काय दिलंत त्याचा हिशोब द्या,भाजपाने महाराष्ट्रामध्ये काय, काय विकास कामे केली आणि भविष्यात करण्याची योजना आहे त्याची माहिती दिली आहे. आमच्याकडे कोणी हिशोब मागितला नव्हता. पण आम्ही तो दिला. पण पवारांनी बारामती, पुणे आणि महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं असंही यावेळी शाह यांनी म्हटलं आहे.

COMMENTS