अमित शाह नितीशकुमारांच्या भेटीला, राजकीय तिढा सुटणार ?

अमित शाह नितीशकुमारांच्या भेटीला, राजकीय तिढा सुटणार ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं सध्या जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या देशाच्या दौ-यावर आहेत. या दरम्यान आज अमित शाह हे बिहारच्या दौ-यावर असून त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. तसेच शाहांनी नितीशकुमार यांच्या घरी जाऊन चहा आणि नाश्ता केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून नितीशकुमार हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच ते आगामी निवडणुकीत तिस-या आघाडीमध्ये सामील होणार असल्याचंही बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आज शाह यांनी नितीशकुमारांची भेट घेतली आहे. तसेच जागावाटपावरुन शाह आणि नितीशकुमार यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नितीशकुमार यांची मनधरणी करण्यात शाह यांना यश येणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे. या भेटीदरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, भाजपा नेते भूपेंद्र यादव, नित्यानंद राय हे उपस्थित होते.

COMMENTS