राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांचं मोठं वक्तव्य!

राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली – राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील तसंच उपमुख्यमंत्रपदाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती आहे. मात्र भाजपलाही स्वबळावर बहुमताचा आकडा पार होईल. मुख्यमंत्री आमचाच होईल आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम निर्णय घेईल. असं शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपदाबाबत दावा केला असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना शाह यांनी युतीमध्ये अनेकदा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. तर अनेकदा पक्षांना आपला विस्तार करायचा असतो. या गोष्टी अजिबात चुकीच्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ. परंतु महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहतील तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम निर्णय घेईल. असं शाह यांनी म्हटलं आहे.

COMMENTS