भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रीपदी विजय पुराणिक यांची नियुक्ती !

भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रीपदी विजय पुराणिक यांची नियुक्ती !

मुंबई – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश सरचिटणीस (संघटन) पदी मा. विजय मनोहर पुराणिक यांची भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी नियुक्ती केली असून या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मा. अमित शाह यांनी मा. विजय पुराणिक यांची महाराष्ट्रासोबत गोव्याच्याही भाजपा प्रदेश सरचिटणीस ( संघटन ) पदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान प्रदेश संघटनमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी विजय पुराणिक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून जबाबदारी होती. विजय पुराणिक यांनी 1987 साली संघाचे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली होती. मुरबाड तहसील प्रचारक, धुळे आणि नगर जिल्हा प्रचारक, संभाजीनगर व लातूर विभाग प्रचारक, देवगिरी प्रांत सहप्रचारक व प्रांत प्रचारक तसेच पश्चिम क्षेत्र सहप्रचारक व प्रचारक या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. तसेच विजय पुराणिक यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे.

COMMENTS