राहुलबाबा मला इटालियन भाषा येत नाही –अमित शाह

राहुलबाबा मला इटालियन भाषा येत नाही –अमित शाह

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारने राजस्थानमधील जनतेसाठी ११६ योजना आणल्या आहेत तरीही भाजपाने काय केले असा प्रश्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे राहुलबाबा मला इटालियन भाषा येत नाही, अन्यथा आम्ही लोकांना किती दिलंय हे तुम्हाला सांगितले असते असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लगावला आहे. राजस्थानमध्ये शनिवारी अमित शाह आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत राजस्थान गौरव यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

दम्यान राजस्थान गौरव यात्रेला झालेली गर्दी बघून राजस्थानमध्ये पुन्हा कमळच बहरणार आहे हे स्पष्ट झाले असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.  तुम्ह चार वर्षांचा हिशोब मागता परंतु देशातील जनता तुमच्याकडून (काँग्रेसकडून) चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे, राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचे काम केले. वसुंधरा राजे सरकारने ज्यापद्धतीने काम केले, त्यावरुन राजस्थानमध्ये भाजपा ऐतिहासिक मिळवणार असल्याचा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS