अमित शाहांच्या जीवाला धोका, एएसएलचे सुरक्षा कवच !

अमित शाहांच्या जीवाला धोका, एएसएलचे सुरक्षा कवच !

नवी दिल्ली – भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा कवच मिळाले असून देशातील निवडक व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात येते. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत होती. परंतु  गुप्तचर विभागाच्या समीक्षेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांच्या सुरक्षेसंबंधी समीक्षा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये आयबीने त्यांना उच्च स्तरीय धोका असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा पुरवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे शाह यांना २४ तास सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात येणार आहे.

दरम्यान या सुरक्षेअंतर्गत शाह यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागणार आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अमित शाहंच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.

सध्या एएसएलचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षा सेवा देतात. दरम्यान, ज्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवण्यात येतात. एसपीजी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात येते. त्यानुसार अमित शाह यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना एएसएसचे पथ सुरक्षा देणार आहे.

 

COMMENTS