कोरोनावर उपचार घेत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी मानले नानावटी रूग्णालयातील कर्मचाय्रांचे आभार !

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी मानले नानावटी रूग्णालयातील कर्मचाय्रांचे आभार !

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सरु आहेत. अमिताभ यांना यकृत आणि इतर आजार असल्यामुळे या काळात त्यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ती काळजी नानावटी रुग्णालयाकडून घेतली जात आहे. याबाबतची माहिती बिग बी यांनी दिली आहे. तसेच अमिताभ यांनी नानावटी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांनी तयार केलेल्या व्हिडिओत कोरोना यौद्धांच भरभरून कौतुक केलं आहे. नानावटी रुग्णलायतील कर्मचाऱ्याची ज्या पद्धतीने माझी काळजी घेत आहेत. त्यासाठी मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे असं बिग बी म्हणाले आहेत.

https://www.instagram.com/tv/CCg47m9HZtJ/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी अमिताभ लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानायक अमिताभ बच्चन हे कोरोनावर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भूमिका घेऊन परततील. “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करुन आपल्याला “आनंद” देतील हीच सदिच्छा.” असं म्हटलं आहे.

तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ट्विट करत अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनी त्यांना असलेल्या लक्षणांच्या आधारे कोरोना चाचणी केली. या चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ते दोघेही नानावटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही सौम्य लक्षणं असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS