अमित शहांच्या आजच्या मुंबई दौ-याचा असा आहे भरगच्च कार्यक्रम !

अमित शहांच्या आजच्या मुंबई दौ-याचा असा आहे भरगच्च कार्यक्रम !

मुंबई – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईच्या दौ-यावर येत आहे. 2019 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मित्र जोडण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अमित शहा विविध राज्यांच्या दौ-यावर जात आहेत. त्यांचा आज मुंबईत दौरा आहे. सकाळी 12 वाजता त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सर्वप्रथम अमित शहा हे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाणार आहे. शेलार यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे शेलार कुटुंबियांना भेट देऊन अमित शहा त्यांचे सांत्वन करणार आहेत.

त्यानंतर दुपारी 1 वाजता रंगशारदामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या जुहूच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी साडेचार वाजता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची त्यांच्या पेडर रोडच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत.

दिवसभारतील सर्वात जास्त चर्चा झालेली त्यांची भेट असेल संध्याकाळी साडेसात वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा पुढील महिन्यात होणारा विस्तार आणि आगामी लोकसभा निवडणुक युतीमध्ये लढवण्याबात अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. रात्री 9 वाजता सह्याद्री गेस्ट हाऊस इथं भाजपची राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणूक तयारी आणि आढावा बैठक अमित शहा घेणार आहेत. आजचा दिवसभरातील शेवटा कार्यक्रम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असेल. रात्री साडेदहा वाजता तिथे मुख्यमंत्री आणि संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासोबत बैठक करतील.

 

अमित शहा यांचा उद्या 6 जून रोजीचा मुंबई दौरा –

 

12 वाजता – मुंबई एयरपोर्ट येथे आगमन

 

12:30 वाजता – आशिष शेलार ह्यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.

 

1 वाजता –  रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक ह्यांच्याशी चर्चा

 

3:30 वाजता – अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट

 

4:30 वाजता – लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट

 

5:30 वाजता – रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट

 

7:30 वाजता –  मातोश्री येथे उद्धव ठाकरे ह्यांची भेट

 

9 वाजता – सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक

 

10:30 वाजता – वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा

COMMENTS