आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रीय होणार ?

आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रीय होणार ?

मुंबई – ठाकरे कुटुंबियांची दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात सक्रीय आहे. आता आणखी एक ठाकरे सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी एक युवक ठाकरे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. मनसेच्या आजच्या मेळाव्यात सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी केली. अर्थात याला सर्वच मनसेच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अमित राज ठाकरे हे मनसेच्या विविध कार्यक्रमात लवकरच दिसण्याची शक्यता आहे. तसे ते अधूनमधून पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत होतेच.

आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात आपला प्रवेश केला आहे. ते युवा सेनेचे अध्यक्ष तर आहेतच. पण नुकतीच त्यांच्याकडे शिवसेने नेतेपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ते सहभागी असतात. विशेषतः कॉलेज आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ते वेळेवेळी पुढाकार घेतात. त्याच धरतीवर युवकांना मनसेकडे आकर्षित करण्यासाठी आता अमित ठाकरे यांना सक्रीय करण्याची मागणी केली जात आहे. राजकारणात अचूक टायमींग साधण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे याबाबत कधी निर्णय घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS