पराभव रणात नाही मनात होतो म्हणून विरोधकांनी पक्ष बदलला- डॉ. अमोल कोल्हे

पराभव रणात नाही मनात होतो म्हणून विरोधकांनी पक्ष बदलला- डॉ. अमोल कोल्हे

वैराग – कोणत्या पक्षावर बोलावं हे बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो, पराभव रणात नाही मनात होतो म्हणून विरोधकांनी पक्ष बदलला अशी खरमरीत टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली आहे. राष्ट्रवादीचे पक्षाचे बार्शी तालुक्याचे अधिकृत उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर ह्यांच्या प्रचारार्थ वैराग येथे खासदार डॉ अमोल यांची प्रचार सभा झाली. भर दुपारी रखरखत्या उणात अमोल कोल्हेंचे भाषण एैकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी तेजस्विनी मरोड होत्या. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही जोरदार टिकास्त्र सोडत दल बदलूंना घरचा रस्ता दाखवा असे मतदारांना आवाहन केले.

सरकारकडे महिला धोरण नाही, ह्या काळातच बलात्कार जास्त झाले, त्यामुळे मुख्यमंत्री गृहमंत्री पद संभाळण्यास असमर्थ ठरले आहे. असंही त्यांनी सांगितले. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी सत्तेत येताच ३ महिन्यात सात बारा कोरा, केजी ते पीजी पर्यंत शिक्षण मोफत, उच्च शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देवू असे सांगून ही निवडणूक दोन विचारांची, तरुणांची आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, मानाजी माने,विक्रम सावळे,जि.प. सदस्या रेखा भूमकर,सरपंच सुजाता डोळसे, प.स. सदस्या रंजना भालशंकर कुमार पौळ, गोविंद पंके, विकास पाटील, संगम डोळसे, तेजस्विनी मरोड, रफिक बेग, विकास शिंदे, सुधीर गाढवे, महेश चव्हाण, मौलाना अब्बास कादरी, संजय भूमकर, बाळासो भूमकर, , शहाजी पाटील, कचरू यादव, रमजान पठाण, प्रशांत भालशंकर ,भूषण भूमकर,
कैलास शेळके ,मृणाल भूमकर
आदी मान्यवर उपस्थित होते.

या सभेवेळी यावली येथील जब्बार बागवान, हभप संतोष काकडे, अरणगाव येथील महेश मोरे, उपळे दु येथील महादेव कसबे, भांडेगाव येथील तानाजी आवाटे यांच्यासह बार्शी येथील दलित महासंघ व मातंग शक्ती कार्याध्यक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांना जाहीर पाठींबा दिला.

COMMENTS