…तर दुसऱ्या क्षणाला खासदारकीचा राजीनामा देईल – अमोल कोल्हे

…तर दुसऱ्या क्षणाला खासदारकीचा राजीनामा देईल – अमोल कोल्हे

इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिवस्वराज्य यात्रा आज इंदापुरात पोहचली आहे. इंदापुरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. ही जागा दोन्ही पक्षाला आपल्याकडे हवी आहे. त्यावरून आजच्या सभेत एका कार्यकर्तेयानं आजच दत्ता मामांचं तिकीट फिक्स करा, असा आवाज उठवला. यावेळी खासदार अमोल कोल्हे बोलत होते. त्यांनी तात्काळ या कार्यकर्त्याला उत्तर दिलं. मी तिकीट फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे. उद्या पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा दे तर दुसऱ्या क्षणाला खासदारकीचा राजीनामा देईल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दत्ता मामांचं तिकीट फिक्स की नाही मी सांगणार नाही. मात्र एवढं नक्की सांगेल की येणाऱ्या विधानसभेला भाजप शिवसेना पुन्हा नाही तर यंदा शिवस्वराज्य येणार असल्याचा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. तसेच खासदारकीचा, सत्तेचा मला मोह नाही. राष्ट्रवादीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करायला तयार असल्याचंही यावेळी कोल्हे यांनी म्हटलं आहे.

इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत पेच

इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत पेच निर्माण झाला आहे. २०१४ मध्ये इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते. आता विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढण्यासाठी तयारीला लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिल्यास हर्षवर्धन पाटील पक्षांतर करण्याची शक्यता आहे. किंबहुना ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS