अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा ?

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला. त्यानंतर अमोल कोल्हे आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा मळवून देण्यासाठी मैदानात उतरले असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

COMMENTS