आढळराव पाटलांना डॉ. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर !

आढळराव पाटलांना डॉ. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर !

जुन्नर – शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर मावळा म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका आढळराव पाटील यांनी केली होती. यावर अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं असून माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं म्हटलं आहे. जुन्नर येथील सभेत ते बोलत होते.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. सर्जिकल स्ट्राईक नेमका कधी झाला ते माहित नाही पण पेट्रोल डिझेलची दरवाढ मात्र नक्की झाली असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका मला साकारायला मिळाल्या हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या वेशातले माझे फोटो बॅनरवर लावू नका असंही आवाहनही यावेळी कोल्हे यांनी केलं आहे.

COMMENTS