मावळा राजेंची मनधरणी करत नाही, उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया!  VIDEO

मावळा राजेंची मनधरणी करत नाही, उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया! VIDEO

सातारा- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यात सातारा विश्रामगृहात बंददाराआड चर्चा झाली आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. परंतु ही भेट मैत्रीपूर्ण असून मी नेहमीच साताऱ्याला आल्यावर महाराजांना भेटतो असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसेच मावळा राजेंची मनधरणी करत नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचे संकेत स्वत: उदयनराजे यांनी देशील दिले आहेत. परंतु अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांच्यासोबत सातारा विश्रामगृहात बंददाराआड चर्चा केल्यामुळे राष्ट्रवादीकडून उदयनराजेंची मनधरणी केली जात असल्याची चर्चा आहे. परंतु ही भेट मैत्रीपूर्ण असून मी नेहमीच साताऱ्याला आल्यावर महाराजांना भेटतो तसेच मावळा राजेंची मनधरणी करत नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS