केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन, भाजपचे मोठे नुकसान – पंतप्रधान मोदी

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन, भाजपचे मोठे नुकसान – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे आज पहाटे निधन झालं आहे. अनंतकुमार यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले आहे. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वीच त्यांच्यावर विदेशातही उपचार करण्यात आले होते. परंतु त्यांची कॅन्सरशी सुरु असलेली झुज आज अखेर संपली आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा स्वास घेतला आहे. अनंतकुमार यांच्या निधनामुळे कर्नाटकमध्ये आजपासून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान अनंत कुमार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या अचानक जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

आपल्या ट्वीटमधून मोदींनी अनंतकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माझे मौलिक सहकारी आणि मित्र अनंतकुमारजी यांच्या निधनाचे वृत्त आल्याने मी अत्यंत दु:खी आहे. माझ्यासाठी ते उल्लेखनीय कामगिरी करणारे असे नेते होते असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

COMMENTS