महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक खुलासे करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.अनिल देशमुख यांनी सुशांत सिंगचा एम्समधील रिपोर्ट जाहीर केला. यामध्ये ७ सिनिअर डाॅक्टरांचा रिपोर्ट आला. यात विषाबाबत काहीही आढळले नाही. सर्वजण सीबीआयच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत. आमची सुद्धा विनंती आहे की त्यांनी लवकर रिपोर्ट जाहीर करावा असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. युएसएच्या युनिव्हर्सिटीने सुध्दा एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये माध्यमांनी आणि राजकीय पक्षाने याला वेगळं वळण दिले.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले गेले. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्यात आले आणि काही भाजपच्या लोकांनी महाराष्ट्र पोलिसांचा माफीया असा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोलिसांच्याबाबतीत विधानं केली.

महाराष्ट्र कोरोनाबरोबर युद्ध लढत असताना महाराष्ट्राला बदनाम करण्यात आले. महाराष्ट्राच्या जनतेची त्यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असंही ते म्हणाले. तसेच सायबर क्राईमच्या माध्यमातुन तपास करून कारवाई करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. जे फेक प्रोफाईल आहेत त्याबाबत तपास करणार आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई केली जाईल असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ज्या गुप्तेश्वरांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्यांचा तुम्ही प्रचार करणार का?, महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS