मी आज जात्यात आहे, बाकी सगळे सुपात आहेत, विधानसभेत अनिल गोटे भाजपवर कडाडले!

मी आज जात्यात आहे, बाकी सगळे सुपात आहेत, विधानसभेत अनिल गोटे भाजपवर कडाडले!

मुंबई – विधानसभेत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षावर जोरदार टीका केली आहे. वाल्याचा वाल्मिकी करू असं हे म्हणतात, पण वाल्याच्या टोळ्याच्या टोळ्या तुम्ही घेतल्या वाल्मिकी सापडायचा कुठे असा सवाल गोटे यांनी केला आहे.मला देशी कट्ट्याने मारण्याचा कट होता. मी धुळ्यातील गन्हेगारीकरणाविरोधात 30 वर्ष लढतोय. या आधीही माझ्यावर असे प्रसंग आले.पण माझं दुर्दैवं माझं सरकार असताना माझ्यावर हा प्रसंग आला असंही यावेळी गोटे यांनी म्हटलं आहे.

मागच्या आठवड्यात माझ्या पत्नीबद्दल अश्लाघ््य शब्दात विनोद थोरात नावाच्या व्यक्तीने मजकूर टाकला, तो वाचण्यालायक नाही. माझ्या पत्नीबद्ल असे अनुद्गार काढले जातायत कोण आहे ? माझी पत्नी जनसंघाच्या महिला आघाडीची पहिली अध्यक्षा कमुताई लिमये यांची ती मुलगी आहे. ज्यांनी आपलं राहतं घर विकलं आणि जनसंघाला कार्यालय घेण्यासाठी पैसे दिले त्यांची ती भाची आहे.

10 नोव्हेंबरला आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानेवे यांनी ज्याला पक्षात घेतले तो आहे विनोद थोरात. हे म्हणतात ते बरोबर आहे वाल्याचा वाल्मिकी करू, पण वाल्याचा टोळ्याच्या टोळ्या तुम्ही घेतल्या वाल्मिकी सापडायचा कुठे. कोण गुन्हेगार आहेत? 28 गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर 302, 307, 355, असे गंभीर गुन्हे आहेत. अशा लोकांना तुम्ही प्रतिष्ठा देयातय. निवडणुका येतात जातात, जय – पराभर असतात तुम्ही असं कराल तर महाराष्ट्रात कुणी सुरक्षित राहू शकणार नाही. आमदाराची पत्नी सुरक्षित नाही, आमदार सुरक्षित नाही.
चौकशी करू अशी पोकळ आश्वासन देऊ नका. मी आज जात्यात आहे बाकी सगळे सुपात आहेत असंही यावेळी गोटे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS