“खडसेंना अडकवण्यासाठी त्यांच्या टेबलवर पैसे ठेवण्यास मला दमानियांनी सांगितलं !”

“खडसेंना अडकवण्यासाठी त्यांच्या टेबलवर पैसे ठेवण्यास मला दमानियांनी सांगितलं !”

जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी त्यांच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत अंजली दमानिया यांनी मला सांगितलं होतं  असा गौप्यस्फोट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी केला आहे. दरम्यान मी नकार दिल्यानंतर अंजली दमानिया यांच्याकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला असलाचंही इनामदार म्हणाल्या आहेत. तसेच आताही त्या माझ्या बदनामीचा प्रयत्न करत असून त्यांनी माझी ४ दिवसात माफी मागावी अन्यथा हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा थेट इशारा इनामदार यांनी दिला आहे. इनामदार यांच्या गौप्यस्फोटामुळे अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान कल्पना इनामदार यांचा संघाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु माझा संघाशी संबध जोडण्याचा प्रयत्न सुकाणू समितीमधील काही लोकांनी आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला असल्याचा गंभीर आरोपही इनामदार यांनी केला आहे. माझा आणि भुजबळांचा कोणताही संबंध नसून, उलट आमदार एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी खडसेंच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत मला अंजली दमानियांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट इनामदार यांनी केला. त्यामुळे इनामदार यांच्या या गोप्यस्फोटानंतर राजकीय वुर्तुळात चर्चा सुरु झाली असून दमानिया याबाबत काय प्रतक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS