अमृता फडणवीसांबाबत खडसे तसं बोलले असते तर देवेंद्र फडणवीस असंच बोलले असते का?, एकनाथ खडसेंनंतर अंजली दमानिया यांचे  देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप! पाहा

अमृता फडणवीसांबाबत खडसे तसं बोलले असते तर देवेंद्र फडणवीस असंच बोलले असते का?, एकनाथ खडसेंनंतर अंजली दमानिया यांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप! पाहा

मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्या आरोपांना अंजली दमानिया यांनी आज उत्तर दिलं आहे. खडसेंच्या कालच्या वक्तव्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेल. काल खडसेंनी मी फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर केस केली हे सांगितलं आहे, हे पूर्ण खोटं आहे. खडसे राजकारणातली घान आहे. खडसेंनी मला फार त्रास दिला. कालच्या वक्तव्याने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान खडसेंना धडा शिकवण्याचा मी निर्णय घेतला. पण देवेंद्र फडणवीस यांना फक्त राजकारण करायचं होतं. मी जो गुन्हा दाखल केला त्यामागे फडणवीस यांचा काही संबंध नाही.
उलट फडणवीस यांनी यात राजकारण केलं. खडसे जर अमृता फडणवीस यांच्याबाबत काही वाईट बोलले असते तर त्यांनी तेच केलं असतं का? असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

३ सप्टेंबर २०१७ रोजी खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एका सभेत माझ्यावर खालच्या दर्ज्यात टिपण्णी केली. त्यानंतर मी त्यांच्यावर आरोप केले. सुरेश शिंदे, पीआय मुक्ताईनगर यांच्याशी माझं बोलण झाले, त्यांनी मला सांगितले आहे की खडसे विरोधात दाखल ५०९ चा गुन्हा अजून संपलेला नाही. खडसे मी तुम्हाला या पुढे धडा शिकवायला खंबीर आहे, तुम्ही कुठल्याही पक्षात जा, मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही, पण आता लढाई माझ्याशी आहे.

खडसे इतका भ्रष्टाचारी कोणी नाही, पवारांनी त्यांना पक्षात कसे घेतले. खडसेंनी मुद्दामहून मला त्रास देण्यासाठी माझ्या विरोधात ६ जिल्ह्यात ३२ केस दाखल केल्या आहेत असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे आज मुंबईत आलेत. उद्या दुपारी 2 वाजता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.मुंबईत आल्यानंतर दमानिया यांच्या या दाव्यांबाबत खडसे यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. आज काही बोलणार नाही. उद्याच त्यावर बोलणार असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS