पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती – अण्णा हजारे

पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती – अण्णा हजारे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सत्र न्यायालयात आज साक्ष दिली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील माझ्या हत्येची सुपारी दिली होती. याबद्दलची तक्रार मी देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नसल्यांचही अण्णांनी म्हटलं आहे. पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शदर पवारांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोपही अण्णांनी केला आहे.

दरम्यान 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या करण्यासाठी पद्मसिंह पाटलांनी हत्या करणाऱ्या आरोपींना 30 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अण्णा हजारे यांनी सत्र न्यायालयात आज साक्ष दिली. त्यानंतर अण्णांनी पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS